
सूर्य किरणांचे तिथे, नाही कुठे नाव||
धुक्याच्या या पडद्या मागे, लपतं जग सारं|
जातात घरट्यात निजुनी मग, चिमुकली पाखरं||हळू-हळू दिवस निघतो, जागवूनिया गाव|
धुक्याच्या त्या रजईला मिळते, दव बिंदूंचे नाव||
सूर्य किरणांच्या तेजाने, दव बिंदू चमके ऐसे|
सागर तळाशी टपोरे, मोती मिळे जैसे||
बघा निसर्गाचा सारा, खेळ असे निराळा|
जीवनात शोधून देखील, खेळाडू न असा मिळावा||