Saturday, April 27, 2013

पिंजरा






काही दिवसांपूर्वी एकदा असंच net वर कविता शोधत असतांना "शिव मंगल सिंह सुमन" ह्यांची कविता "हम पंछी उन्मुक्त गगन के" नजरेस पडली, खूप सुंदर, आयुष्याशी जुडलेली आणि मनाला भिडणारी अशी ही रचना श्री सुमन जींनी केली आहे. 
               पूर्ण कविता इथे मांडण शक्य नाही पण खरच भावार्थ समजायला गेलो तर आपल्या जीवनाचं सत्य असल्याचा भास होतो. आपलं आयुष्य पिंजऱ्यात कोंडलेल्या त्या पक्ष्या सारखंच तर नाही ना , जो पिंजऱ्याचा आडून मोकळं आकाश आणि त्या आकाशात मुक्तं झेप घेणाऱ्या पाखरांना बघतो आणि एकंच उदासीन विचार त्याच्या मनात येतो कि, आपल्याला पण पंख मोकळे करून उडता आलं असतं तर किती छान झालं असतं.
              कुणी तरी खरंच म्हंटल आहे,पिंजरा सोन्याचा असला तरी मोकळ्या आकाशाची सर त्याला येउच शकत नाही . तसंच काहीसं माणसांच्या बाबतीत सुद्धा होतं ,दुसऱ्याच्या सुखाचा विचार करता करता स्वतःचे आयुष्य जगणंच विसरून जातो, आणि ही खंत कायम स्वरूपी मनात राहून जाते कि आपणही असं जगू शकलो असतो…
             असो………. मी काही इथे तत्वज्ञान मांडत  नाही ,पण एक दिवस तरी मोकळा श्वास घेऊन बघावा. एक दिवस तरी पिंजऱ्याचे दार उघडं राहावं आणि त्या पक्ष्याने  सुद्धा आकाशात ऊंच झेप घ्यावी, क्षितीजाला भिडावे, आणि आपण सुद्धा दुसऱ्यांचा विचार सोडून मोकळा श्वास घ्यावा स्वातंत्र्याचा, विश्वासाचा मोकळा आणि मुक्त श्वास …….  विचार करावा तर फक्तं स्वतःचा  आणि त्या क्षितीजाचा आणि ध्येयाचा ज्याचा ध्यास आपण घेतला आहे . जिथे पोचण्या साठी आपण तत्पर आहोत. 

Saturday, March 12, 2011

खेळ निसर्गाचा


थंडीत रात्री धुक्याने, वेढून घेतले गाव|
सूर्य किरणांचे तिथे, नाही कुठे नाव||
धुक्याच्या या पडद्या मागे, लपतं जग सारं|
जातात घरट्यात निजुनी मग, चिमुकली पाखरं||
हळू-हळू दिवस निघतो, जागवूनिया गाव|
धुक्याच्या त्या रजईला मिळते, दव बिंदूंचे नाव||
सूर्य किरणांच्या तेजाने, दव बिंदू चमके ऐसे|
सागर तळाशी टपोरे, मोती मिळे जैसे||
 बघा निसर्गाचा सारा, खेळ असे निराळा|
                                                                   जीवनात शोधून देखील, खेळाडू न असा मिळावा||

Monday, November 22, 2010

बंध प्रेमाचे

                             




मावळत्या सूर्याच्या तेजात, विरह वेदना भासतात|
श्यामवर्णी पृथ्वीच्या मनात, त्याच भावना दाटतात||
भेटीन प्रिये उद्या तुला, सूर्य म्हणतो जातांना |
अश्रू ओघळतात पृथ्वीचे, निरोप त्याला देतांना||
अश्रुपूर्ण नयनांनी ती, निरोप सूर्याला देते|
लवकर सरावी रात्र हि, प्रार्थना करू लागते||
बघता बघता पाहत होते,सूर्य पुन्हा येतो|
सहस्त्र किरणांनी पृथ्वीला, मिठीत घेऊ पाहतो||
कुणीही असो नर-नारायण,भावना एकच असतात|
तुम्हीच सांगा बंध प्रेमाचे,का कुणाला चुकतात???

Saturday, November 13, 2010

जीवन चक्र

गर्मी के दिनों में चिलचिलाती धुप से जब मन उबने लगता है, जब धरती की प्यासी आखे आसमान को आशा भरी निगाहों से देखने लगती है, तब इस प्यासी धरती की प्यास बुझाने बदलो का घुमट लेकर थंडी हवा आती है, और इन काले बादलो से रिमझिम बुँदे बरसने लगती है| बरसात के आने से सब तरफ हरियाली छा जाती है|
             यह बरसात गर्मी से मुरझाई धरती में नया जीवन भर देती है| हर तरफ हरी घास लहलहाते खेत, वन सब जी उठते है| एक बार फिर धरती पर जीवन की शुरुवात होती है|
              धरती के गर्भ से नए अंकुर निकलते है, मनो कही राम या  कृष्ण का जन्म हो रहा हो और इसी ख़ुशी में सम्पूर्ण धरती झूमने लगती है|एक बार फिर वनों, उद्द्यानो मे पंछियों के सुमधुर स्वर गूंजने लगते है व धरती लाल, पीले,हरे विविध रंगों की छटा बिखेरने लगती है, जैसे किसी चित्रकारने अपने सारे रंग यही भर दिए हो| झरनों में एक नई उम्मीद पानी के रूप में बहाने लगती है| पक्षियों की चहक, फूलो की महक,झरने की कलकल से पूरा वातावरण मंत्रमुग्ध होने लगता है| एक संगीत मय वातावरण की सुखद अनुभूति हमे मिलती है|
              गर्मी के बाद चार महीनो के लम्बे अंतराल के बाद जीवन के, खुशियों के विविध रंग इस धरती पर नज़र आने लगते है| लेकिन यह सुख सदा के लिए इस धरती पर नहीं रहता, क्योकि इस बरसात के बाद सर्दी तथा फिर एक बार गर्मी की ऋतू  आती है और एक बार फिर मृत्यु का तांडव देखने को मिलता है और जीवन चक्र ऐसे ही निरंतर चलता रहता है|
            प्रकृति के इस खेल से ही हमे जीवन की सबसे अनमोल सिख मिलती है, कि सुख हो या दुःख,जीवन हो या मृत्यु यहाँ कोई भी शाश्वत नहीं है अर्थात ज्यादा समय तक नहीं रहते| जिस प्रकार सुख  के बाद दुःख व एक बार फिर सुख आता है, उसी प्रकार जीवन के बाद मृत्यु तथा फिर नए जीवन कि उत्पत्ति होती है और जीवन - मृत्यु का यह चक्र चलता ही रहता है|           

Wednesday, September 15, 2010

सावन




भीगी भीगी सुबह संग, खुशबु मीठी आई |

जीवन में जैसे मेरे, खुशियाँ ही हो छाई ||
देखा मैंने बाहर जब , बगियाँ थी वह हरी |
जाने किस परी ने थी, जादुई छड़ी फेरी ||
चारो तरफ थे, सावन के झूले पड़े |
आम- बरगद-और-पीपल, तनकर सभी खड़े ||
रंगभरे फूलो से , महकी थी सब क्यारी |
तभी अचानक कही से, तितली आई प्यारी ||
उजली सुबह महकी बगियाँ,रूप था मुझको भाया |
कहा उसने आकर कानो में , देखो  सावन आया  ||



Tuesday, August 31, 2010

Friendship is not a two way    
road ................................
but it is a one way  traveled by two people,
 together hand in hand.......................

Monday, August 30, 2010

आठवण

लहनाची झाले मोठी,
मी ज्या अंगणात खेळली |
आज तेच अंगण झाले ,
मला का अनोळखी ||

ह्याच अंगणी पकडुनी फिरले,
 मी बाबांचे बोट |
आज अचानक विरह वेदनांनी,
 थरथरले माझे ओठ ||
भावाला ज्या बांधली मी राखी,
 बहिण बनले मी बाल सखी |
घेउनी नात्यांची हि शिदोरी,
 आज निघाले मी सासरी ||
इथेच लाउनी सर्वांना लळा,
 भातुकलीचा खेळूनी खेळ आगळा |
दिवस विरला दिवसा मागून,
 क्षण सरला क्षणा मागून |
आई ची माया बांधुनी या पदरी ,
आज निघाले मी सासरी|
आज निघाले मी सासरी||