काही दिवसांपूर्वी एकदा असंच net वर कविता शोधत असतांना "शिव मंगल सिंह सुमन" ह्यांची कविता "हम पंछी उन्मुक्त गगन के" नजरेस पडली, खूप सुंदर, आयुष्याशी जुडलेली आणि मनाला भिडणारी अशी ही रचना श्री सुमन जींनी केली आहे.
पूर्ण कविता इथे मांडण शक्य नाही पण खरच भावार्थ समजायला गेलो तर आपल्या जीवनाचं सत्य असल्याचा भास होतो. आपलं आयुष्य पिंजऱ्यात कोंडलेल्या त्या पक्ष्या सारखंच तर नाही ना , जो पिंजऱ्याचा आडून मोकळं आकाश आणि त्या आकाशात मुक्तं झेप घेणाऱ्या पाखरांना बघतो आणि एकंच उदासीन विचार त्याच्या मनात येतो कि, आपल्याला पण पंख मोकळे करून उडता आलं असतं तर किती छान झालं असतं.
कुणी तरी खरंच म्हंटल आहे,पिंजरा सोन्याचा असला तरी मोकळ्या आकाशाची सर त्याला येउच शकत नाही . तसंच काहीसं माणसांच्या बाबतीत सुद्धा होतं ,दुसऱ्याच्या सुखाचा विचार करता करता स्वतःचे आयुष्य जगणंच विसरून जातो, आणि ही खंत कायम स्वरूपी मनात राहून जाते कि आपणही असं जगू शकलो असतो…
असो………. मी काही इथे तत्वज्ञान मांडत नाही ,पण एक दिवस तरी मोकळा श्वास घेऊन बघावा. एक दिवस तरी पिंजऱ्याचे दार उघडं राहावं आणि त्या पक्ष्याने सुद्धा आकाशात ऊंच झेप घ्यावी, क्षितीजाला भिडावे, आणि आपण सुद्धा दुसऱ्यांचा विचार सोडून मोकळा श्वास घ्यावा स्वातंत्र्याचा, विश्वासाचा मोकळा आणि मुक्त श्वास ……. विचार करावा तर फक्तं स्वतःचा आणि त्या क्षितीजाचा आणि ध्येयाचा ज्याचा ध्यास आपण घेतला आहे . जिथे पोचण्या साठी आपण तत्पर आहोत.